लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी....
लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : ग्रामीण रुग्णालय बार्शिटाकळी येथे उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान यांची मागणी
सविस्तर वृत्त असे की बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयातील कामकाज पाहणारे कर्मचारी हे नेहमी गैरहजर राहतात. ते वेळेवर रुग्णालयामध्ये कामावर उपस्थित राहत नाहीत त्यांना कार्यालयीन वेळेचे भान राहत नाही, त्यामुळे रुग्णालयामध्ये कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आधीच उन्हाळ्याचे दिवस व त्यातही कर्मचारी उशीराने येत असल्याने नागरिकांना डॉक्टर व कर्त्यांमचाऱ्यांची वाट पाहत ताटकळत बसावं लागते. ह्यामध्ये जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे व ह्या बाबीला घेऊन जनतेमध्ये आक्रोश होत आहे. त्यामुळे कामावर उशिराने येणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच विवाह नोंदणी सध्या आपल्या कार्यालयात ऑफलाईन सुरु आहे तो ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी या करिता रूग्ण कल्याण समिती सदस्य ईमरान खान यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ वानखडे यांना तसेच प्रतिलीपी म्हणून जिल्हाधिकारी साहेब, अकोला ,उप संचालक साहेब (आरोग्य सेवा) अकोला मंडळ व जिल्हा शल्य चिकित्सक साहेब, जिल्हा रुग्णालय, अकोला यांना केली आहे
Comments
Post a Comment