Posts

Showing posts from September, 2024

बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा....

Image
बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : स्थानिक आठवडी बाजार हनुमान मंदिरा समोर ,पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात बैल पोळा सण, शेतकरी वर्ग दरवर्षी मोठ्या आनंदाने , उत्साहाने साजरा करत असतात . विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात . बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात . बैल म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आहे . आज काल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की पेरणी , नांगरणी , वखरणी बैलांच्या साहाय्याने केली जात असे . पूर्वीच्या काळी मोटर गाड्या नव्हत्या ,तेव्हा दूरच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता . अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा ,बैलगाडी मधूनच काढली जात असे . या काळात बैल शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जोडून होता . त्यांचे आभार मानण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो . बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात ,मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करण्यात ...