बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा....
बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा....
बार्शिटाकळी : स्थानिक आठवडी बाजार हनुमान मंदिरा समोर ,पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात बैल पोळा सण, शेतकरी वर्ग दरवर्षी मोठ्या आनंदाने , उत्साहाने साजरा करत असतात . विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात . बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात . बैल म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आहे . आज काल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की पेरणी , नांगरणी , वखरणी बैलांच्या साहाय्याने केली जात असे . पूर्वीच्या काळी मोटर गाड्या नव्हत्या ,तेव्हा दूरच्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता . अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा ,बैलगाडी मधूनच काढली जात असे . या काळात बैल शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जोडून होता . त्यांचे आभार मानण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो . बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात ,मोठ्या उत्साहाने पोळा सण साजरा करण्यात आला.
यावेळी बार्शिटाकळी शहरातील माळीपुरा, सोमवार पेठ, वंजारी पुरा, तेलीपुरा, गवारी पुरा, भावसार पुरा, गजानन नगर, लबडे वेटाळ, ढोरे वेटाळ, अशोक नगर, महात्मा फुले नगर, येथील शेतकऱ्यांनी बैल सजवुन,गावातून वाजतगाजत पोळ्याच्या ठिकाणी, सायंकाळी ५:३० वाजता आणले .हनुमान मंदिरांचे विश्वस्त श्रीकृष्ण आखरे, दिनेश रत्नपारखी, संतोष कुरळे, अनिल बुलबुले, अनंता केदारे, या सर्वांनी प्रमुख बैलांची पुजा करुन ,वंजारी पुरा निवासी रामभाऊ भडांगे यांच्या बैल जोडीला मान देऊन ,मंदिरात आरती करून पोळा सण साजरा करण्यात आला . या वेळी दर वर्षीप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यावर पोळा सोडण्यात आला.
या उत्सवात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंतराव भंडागे, रमेश वाटमारे, संतोष राऊत, भारत बोबडे, गजानन आखाडे, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, डीगाबर भंडागे , शंकरराव वरघट, पत्रकार आजम खान,भाजपा माजी शहराध्यक्ष श्रीराम येळवणकार, चंदुशेठ वाटमारे, गजानन वाटमारे, गोपाल कापकर, दिपक वाटमारे, मासुम खान, अनंता केदारे, सौरभ अग्रवाल, सय्यद रियासत, सय्यद अमीन उर्फ छोटू भाई, अनिल म्हस्के, दिलीप कळसाईत, भास्कर ग्याने, राजेंद्र पळसकार, प्राभाकर चव्हाण , विनायक टेकाडे, उमेश मानेकर, राजेश साबळे, आकाश धात्रक, ईमरान खान, सै.रियासत, अनंता केदारे, विजय भातखडे, मदन धात्रक, नागोराव भातखडे, विजय देशमुख, सादिक लीडर, भोला इनामदार, व शांतता समितीचे सदस्य तथा टाऊन मेजर राजू जोधारकर, खुपिया विभागाचे किशोर पिंजरकर, सांवग मेजर, व अन्य पोलीस तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment